सरलेदिगर ता.कळवण जि.नाशिक
gsarledigar@gmail.com
सरलेदिगर ता.कळवण जि.नाशिक
gsarledigar@gmail.com
सुचना :
सरलेदिगर हे गाव महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक प्रगतीशील गाव आहे.२०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या १०१२ आहे.गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २ अंगणवाडी केंद्र २ सामुदायिक सभामंडप १ पाणीसाठवण सार्वजनिक विहीरी इ.सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावात वाघदेव देवस्थान हे नागरिकांचे श्रद्धास्थान आहे.गावात भवानी माता मंदिर व हनुमान मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून अधिकतर भात,नाचणी,कांदा,मका,बाजरी,सोयाबीन गहू व उडीद हि प्रमुख पिके घेतली जातात भात व कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळते.
सरलेदिगर ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत.घरकुल योजना अंतर्गत शेकडो कुटुंबांना घराचा लाभ मिळाला आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सरलेदिगर गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF+)दर्जा मिळवला आहे.गावाच्या हद्दीत चणकापूर हा जलसंधारण प्रकल्प (धरण) बांधण्यात आलेला आहे.
ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व ४ सदस्य ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मिळून गावाचा सर्वागीण विकास घडवून आणतात.ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सरलेदिगर हे गाव आहे.हे गाव उत्तर महाराष्ट्र प्रदेशातील आहे. हे गाव जिल्हा मुख्यालय नाशिकपासून ७५ किमी अंतरावर आहे.कळवण पासून २७ किमी. राज्याची राजधानी मुंबईपासून २५४ किमी.आहे.सरले गावाला देसगाव पोस्ट ऑफिसला जोडनेत आलेले आहे.आणि पोस्ट मुख्य कार्यालय कळवण येथे आहे.
देसगाव २.५ (km) बेंदीपाडा १ (km) खडकवन ५ (km) अभोणा १२ (km) कनाशी ११ (km) चणकापूर ८ (km) हि सरलेदिगर जवळची गावे आहेत.देवळा,सुरगाणा हि शहरे सरलेदिगर पासून जवळ आहेत.
सरलेदिगर हे गाव साधे,कष्टप्रधान आणि पारंपरिक जीवन शैलीसाठी ओळखले जाते.शेती हा गावकरींचा मुख्य व्यवसाय असून भात,नाचणी,कांदा.मका,बाजरी आणि विविध हंगामी भाजीपाला यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
गावात सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक परंपरा दृढपणे जपल्या जातात.वर्षभर साजरे होणारे सन उत्सव ग्राम दैवतांची पूजाअर्चा तसेच वाघदेवाची पूजा हा सन गावाच्या एकात्मतेचे प्रतिक मानले जाते.येथे आदिवासी परंपरा आणि संस्कृती चे जतन केले जाते.होळी,गणेशोत्सव,दिवाळी,नवरात्र यासह डोंगर्या देव ह्या स्थानिक देवतांचे (निसर्ग) कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
येथील लोक ‘अतिथी देवो भाव, ह्या मूल्यांना आचरणात आणणारे आहेत. येथील लोक मेहनती लोक आहेत. तरून पिढी शिक्षण, खेळ व रोजगाराच्या संधी शोधून प्रगती कडे वाटचाल करत आहे. सरलेदिगर लोकजीवनात आदिवासी संस्कृती व पारंपारिक ग्रामीण जीवनमान आढळून यते.सरलेदिगर गावाची विकासाकडे वाटचालीचे कार्य उत्तम असे सुरु आहे..
ग्रामदैवताचे मंदिर:- सरलेदिगर शिव जवळ वाघदेवाची वसुबारस च्या दिवशी संपूर्ण गावातील नागरिक मोठ्या उत्साहाने पूजा करतात.
सरलेदिगर गावात हनुमानाचे भव्य दिव्य असे मंदिर आहे.तसेच ग्रामपंचायत अंतर्गत पुनर्वसन पाडा येथे भवानी माता मंदिर व भव्य असे हनुमान मंदिर वस्तीची शोभा वाढवतात.व येथे धार्मिक कार्यक्रम होत असतात.
हिरवीगार शेती:- सरलेदिगर येथील भात पिकासाठी प्रसिद्ध असून येथे पसरलेली हिरवीगार शेती पाहण्यासारखी आहे.शेती हा ग्रामजीवनाचा मुख्य आधार आहे.
जलसंधारण प्रकल्प:- गावात गिरणा नदीवरील चणकापूर पाणलोट क्षेत्र प्रकल्प हा गावाची शोभा वाढवतो.चणकापूर धरणामुळे गावाच्या शेती व्यवसायाला मोठ मोठ्या प्रमाणात सुजलाम सुफलाम करते.चणकापूर धरणाचा शेतकर्यांना मोठा फायदा झाला आहे.
कसे पोहचावे:-
सरलेदिगर या ठिकाणी येणेसाठी कळवण बस आगारातून देवळी कराड बसने देसगाव गावात उतरून आपन सरलेदिगर पर्यंत पोहचू शकतो.नाशिक वरून येताना नांदुरी अभोणा चणकापूर मार्गे खाजगी वाहनाने आपण सरलेदिगर येथे पोहचू शकतो.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०११/१२
तंटामुक्त पुरस्कार – २०१५/१६
टी.बी.मुक्त पुरस्कार -२०२३/२४
हागणदारी मुक्त गाव, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रम व अभियानात गावाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
श्री. ओमकार पवार (IAS)
श्रीमती. वर्षा फडोळ-बेडसे
श्री.रमेश ओंकार वाघ
श्रीमती.वंदना दशरथ सोनवणे
श्री.युवराज सयाजी सोनवणे
श्रीमती.ज्योती बोरसे (ग्राम महसूल अधिकारी)
श्री.संजय चव्हाण (महसूल सेवक)
श्री.शशिकांत रमेश आहिरे (पोलीस पाटील)
श्रीमती.आर.एम.कुवर (कृषि सहाय्यक)
श्री.नंदु हरि बागुल (बी.एल.ओ.)
🌾 ग्रामपंचायत क्षेत्रफळ
४६२ हेक्टर
🏢 वार्ड संख्या
३
👥 पुरुष संख्या
४९७
👥 स्त्री संख्या
५१५
👥 कुटुंब संख्या
२२८
👥 एकूण लोकसंख्या
१०१२